खेड तालुक्यात श्री समर्थ विद्यालय शंभर नंबरी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या S.S.C. बोर्ड परीक्षेत चिंबळी फाटा येथील इंग्रजी व सेमी या दोन्ही माध्यमांचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यालयाने उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. विद्यालयाचे एकूण 131 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते,त्यापैकी विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या – 83 असून प्रथम श्रेणी मध्ये 45 व द्वितीय श्रेणी मध्ये -03 विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले. विद्यालयाचे प्रथम तीन गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे:-

इंग्रजी माध्यम:
शेख रियाजबीन जमालोउद्दीन(92.80 – प्रथम)
पवार प्रियांका हनुमंत (92.40-द्वितीय) ,राठोड शुभम सुरेश (89.80-तृतीय)

सेमी माध्यम:-

गावडे मधुरा शिवराम (94.20 प्रथम)
बहिरट विशाखा रोहिदास (90 – द्वितीय)
यजगार शुभम महादेव (88.80 – तृतीय)

            सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकवृंद पर्यवेक्षिका शोभा तांबे,मोनाली मुंगसे, सुनीता नाटक ,रुपाली पवळे,सपना टाकळकर सौ.स्नेहल विधाते,ललिता बडदे,रुपाली सपकाळ,वैशाली पटले,रुपाली नाकट,सुनेत्रा खालोकर,अजित थोरात,रत्नाकर वाघमारे,स्नेहा कडावकर,शिल्पा बुत्कर,मोनिका हिंगे ,दीपाली थोरात,निखिल कांबळे, सिद्धेश्वर धोंडगे या सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे प्राचार्या मा.सौ.अनिता टिळेकर.

श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव मा.सौ.विद्याताई गवारे व संस्थापक अध्यक्ष मा.श्री.शिवाजीराव गवारे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.