इंद्रायणी शिक्षण संस्था संचलित इंदिराजी माध्यमिक विद्यालय मोई या विद्यालयातील मुख्याध्यापक श्री नवनाथ तोत्रे सर यांना प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँकेकडून सन 2022-23 चा आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. यावेळी बँकेचे संस्थापक तुकाराम गुजर अध्यक्ष कांतीलाल गुजर उपस्थित होते. तोत्रे सरांना पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री समर्थ ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव गवारे यांनी सरांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.