३६ वर्षांनी भरला माजी विद्यार्थ्यांचा १० वीचा वर्ग

रविवार दि. १ ऑक्टोबर रोजी नागेश्वर विद्यालय मोशी येथे ३६ वर्षांनी माजी विद्यार्थ्यांचा दहावीचा वर्ग भरला त्यावेळच्या १९८७ च्या बॅचचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. या निमिताने शाळेतील आठवणींना उजाळा मिळाला एकमेकांच्या सुख-दुःखाची देवाण घेवाण झाली. एकूण १२० विद्यार्थी व १४ शिक्षक उपस्थित होते. संदेश आल्हाट, डॉ रोहिदास आल्हाट, संभाजी अवघडे चंदन मु-हे, शांताराम बोराटे, सुनिल मोहिते, भगवान घिगे, नंदकुमार सानप, शाम बहिरट, पंडीत मोकाशी, नारायण बोऱ्हाडे, विठ्ठल आहेर, रोहिदास जगनाडे, लक्ष्मण बुर्डे, उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्याच्या वतीने शाळेला दोन ४३ ईंची एलसीडी देण्यात आले, ते मुख्याध्यापक कळमकर सर यांनी स्विकारले.
याप्रसंगी शिक्षक आर आर पवार, ए. सी अरण्य, काटकर सर, छगन खुळपे, मोहिते सर, खुडे सर, इंगळे सर राऊत सर, अढागळे मॅडम, शेख मॅडम, भुजबळ मॅडम, कामठे मॅडम, सेवक सांडभोर आणि भरम डोंगरे इ. उपस्थित होते. या सर्व वर्ग मित्रांना एकत्र आणण्याचे काम संभाजी अवघडे यांनी केले, सुरेखा कातोरे , अनिता खुरपे, आशा कामठे, वैजनता ,शैला बहिरट, ठाकूर ,सविता सायकर, आशा बोऱ्हाडे, या विद्यार्थीनी याचे ही योगदान लाभले उपस्थित सर्वांचे आभार नितिनदादा सस्ते यांनी मानले.