हिताची एम्प्लॉईज युनियन’च्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेल विजयी

चाकण औद्योगिक वसाहतीमधील महाळुंगे इंगळे येथील अस्टेमो फाय एम्प्लॉईज युनियनच्या त्रैवार्षिक निवडणुकीमध्ये संस्थापक जीवन येळवंडे यांच्या परिवर्तन पॅनेलवे नऊ पैकी आठ उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले. ही निवडणूक २०२३ ते २०२६ या तीन वर्षांसाठी झाली आहे. यामध्ये परिवर्तन पॅनलने विरोधी पॅनेल सत्यमेव जयतेचा पराजय केला. या निवडणुकीमध्ये एकूण ३८३ कामगारांनी बजावला आहे

परिवर्तन पॅनलचे विजया उमेदवार पुढीलप्रमाणे (कंसात मिळालेली मते) = जीवन येळवंडे मोठ्या संघर्षानंतर अंतर्गत संघटना स्थापना करून नवीन कामगार प्रतिनिधींना काम करण्याची संधी दिली होती. मात्र, कामगार हितासाठी कमकुवत निर्णय क्षमता, कोणताही धोरणात्मक दृष्टिकोन नसल्याने आणि फक्त कामगारांमध्ये दोन गट पाडणारे प्रतिनिधी मागील निवडणुकीत निवडून आल्याने कामगारांमध्ये प्रचंड असतोष निर्माण झाला होता. तो राग त्यांनी आम्ही परिवर्तनाची हाक दिल्यावर मतदानातून व्यक्त केला.

जीवन येळवंडे अध्यक्ष हिताची अस्टेमो फाय एम्प्लॉईज | यूनियन, चाकण