‘स्मार्ट सीड्स’ तर्फे श्री समर्थ विद्यालयातील 10वीच्या विद्यार्थ्यांना स्मरणशक्ति व एकाग्रता वाढविण्याबद्दल मार्गदर्शन.

कुरुळी दि.1 सप्टेंबर:- चिंबळी फाटा येथील श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज मध्ये आज शनिवार दि.02/09/2023 रोजी विद्यालयातील 10 वी च्या विद्यार्थ्यांना स्मरणशक्ती व एकाग्रता वाढ या विषयावर प्राजक्ता दंडवते व यांनी मार्गदर्शन केले. मुलांना उत्तरे लक्षात ठेवण्यासाठी काय अडचणी येतात, त्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे, अभ्यास कसा करावा स्मरणशक्ती कशी वाढवावी त्यासाठी ब्रेनची एक्सरसाइज कशी करावी याबद्दल त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
स्मार्ट सिड्स करिअर कोशांट व श्री समर्थ स्कूल व कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयाच्या हॉल मध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या वेळी श्री समर्थ शि. प्र.मंडळाचे अध्यक्ष मा.श्री .शिवाजीराव गवारे सर,सचिव मा.सौ.विद्याताई गवारे मॅडम,प्राचार्या मा.सौ.अनिता टिळेकर मॅडम, मा.सौ.मोनाली मुंगसे मॅडम,मा.सौ.शुभांगी भोंडे मॅडम,मा. सौ . रूपाली सपकाळ मॅडम,इयत्ता दहावीच्या वर्गशिक्षिका बदडे मॅडम, अनाप मॅडम, दिघे मॅडम सर्व शिक्षक,विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.ललिता बडदे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन अनाप मॅडम यांनी केले.