श्री समर्थ स्कूल, चाकण मध्ये स्वच्छता अभियान

सोमवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी श्री समर्थ स्कूल चाकण मध्ये स्वच्छता अभियान उपक्रम राबवण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक श्री शिवाजीराव गवारे सर आणि सचिव सौ विद्याताई गवारे मॅडम , मुख्याध्यापिका स्वाती सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला, यात शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांकडून श्रमदान या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
“स्वच्छता हे एक बडा अभियान आप भी दो अपना योगदान, इसी को ध्यान मे रख कर समर्थ के बच्चो ने दी गांधीजी को स्वच्छांजली”
यावेळी विद्यार्थ्यांकडून सत्याग्रह व आंदोलनाच्या प्रकल्पांचे प्रदर्शन करण्यात आले .यामध्ये आजी-आजोबांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला व आजी आजोबाही उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले, आणि त्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.