श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज निघोजे येथे गणरायांचे मोठ्या उत्साहात आगमन

बुधवार दिनांक २० सप्टेंबर 2023 रोजी श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज येथे यावर्षी सजावट करण्यासाठी , “गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी” हा विषय मांडण्यात आला .यामध्ये माणुसकीचे धडे शिकवणाऱ्या विविध संताची विचारे दर्शवण्यात आली.
गणेश उत्सव शालेय उपक्रमामध्ये दामिनी पथकाच्या माध्यमातून महाळुंगे येथील पोलीस कॉन्स्टेबल मोनाली धिडे आणि रिंकल कुऱ्हे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना चांगला आणि वाईट स्पर्श कसा ओळखावा , जर असा अनुभव आला तर दामिनी पथक कशा रीतीने मदत करते याची माहिती दिली. ✨
गणेश उत्सवातील दुसऱ्या आरतीचा मान अशा या संपूर्ण जीवन देशाच्या रक्षणासाठी समर्पित करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात आला.

यावेळी श्री बबनराव गवारे सर,शाळेचे संस्थापक श्री शिवाजीराव गवारे सर आणि संस्थापिका सौ. विद्याताई गवारे मॅडम हे उपस्थित होते. तसेच शाळेच्या प्राचार्य सौ.पल्लवी कुटे मॅडम आणि उपप्राचार्य सौ. ज्योती येळंवडे मॅडम तसेच श्री अमित पवळे सर आणि संपूर्ण शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.✨