श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज चिंबळी फाटा येथे 76 स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

मंगळवार दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज चिंबळी फाटा येथे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेच्या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 7.30 वाजता प्रभात फेरी काढून करण्यात आली. शाळेतल्या सर्व मुलांनी प्रभात फेरीच्या वेळी विविध घोषणांनी सर्व परिसर दुमदुमून टाकला. सर्वप्रथम श्री समर्थ पतसंस्थेच्या प्रांगणातील ध्वजारोहण  श्री समर्थ  ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष मा.श्री शिवाजीराव गवारे साहेब यांच्या मातोश्री , सर्वांच्या मार्गदर्शिका व कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या  मा .सौ. सुमनताई  गवारे यांच्या हस्ते करण्यात आले. श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज च्या प्रांगणातील ”ध्वजारोहण” मा.श्री.विकास शेठ अवघडे ,सुधीर शेठ कड ,उमेश शेठ येळवंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. शिवाजीराव गवारे सर, संस्थेच्या संस्थापिका माननीय सौ. विद्याताई गवारे मॅडम,प्राचार्या सौ.अनिता टिळेकर मॅडम, पतसंस्थेचे कार्यकारी अधिकारी श्री.अमोल गवारे सर,पतसंस्था संचालिका सौ.नंदाताई येळवंडे, सुनीताताई नाटक,रुपालीताई पवळे,पांडुरंग करवंदे,संतोष अल्हाट,संतोष जाधव ,विलासराव गायकवाड ,श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज चे सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी ,पतसंस्थेचे सर्व कर्मचारी,विद्यार्थी व पालक मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.रुपाली पोटे व पूजा शामकुवर मॅम यांनी केले.आभार प्रदर्शन नीलिमा डोंगरे यांनी केले.
कार्यक्रमा  वेळी विध्यालयातील RSP व स्काऊट-गाईड च्या  विद्यार्थ्यांनी संचलन करत राष्ट्रध्वज व मान्यवरांना मानवंदना दिली.मुलींनी स्वरक्षण कसे करावे यावर आधारित  कराटे डेमो सदर करण्यात आला. विद्यार्थ्यांनी भारत माता व स्वतंत्र वीरांची  वेशभूषा करून  देशभक्तीपर भाषणाच्या द्वारे आपले मनोगत व्यक्त केले.तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील विद्यार्थ्यांनी संचलन करत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.  त्यानंतर कार्यक्रमाची सांगता विद्यालयाच्या सहशिक्षिका सौ.वैशाली पटले यांनी  ‘वंदे मातरम’  गीत गावून केली. कार्यक्रम यशस्वी करण्यात  विध्यालायाच्या सांस्कृतिक विभागाने मोलाची कामगिरी बजावली.उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रम संपन्न झाला..