श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज निघोजे येथे 76 स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

मंगळवार दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज निघोजे येथे मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. शाळेच्या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 7.30 वाजता प्रभात फेरी काढून करण्यात आली. शाळेतल्या सर्व मुलांनी प्रभात फेरीच्या वेळी विविध घोषणांनी सर्व परिसर दुमदुमून टाकला. सर्वप्रथम शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आला यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय मा.श्री शिवाजीराव गवारे सर आणि संस्थेच्या संस्थापिका माननीय मा.सौ. विद्याताई गवारे मॅडम पतसंस्थेचे सहकार्य कर्मचारी सौ पल्लवी कुटे मॅडम (प्रिन्सिपल , Nighoje) कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री कैलासराव येळवंडे (पतसंस्था सल्लागार), श्री संदीप येळवंडे, श्री दत्तात्रय कान्हूरकर, श्री युवराज शिंदे,(पश्चिम महाराष्ट्र वारकरी संप्रदाय अध्यक्ष) ,मा. श्री कसबे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.हेमा मोठे मॅम यांनी केले. ध्वजारोहनानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत, ध्वजगीत ध्वज प्रतिज्ञा सादर केली त्यानंतर कवायत प्रकार -डंबेल्स याचे अतिशय मनमोहक रीतीने विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणाच्या द्वारे आपले मनोगत व्यक्त केले .इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून राष्ट्रीय प्रतीकांची माहिती सर्वांना करून दिली. तसेच माननीय श्री राजू जमदाडे या पालकांनी काव्याच्या माध्यमातून आपल्या भारताला स्वातंत्र्यप्राप्तीसाठी बलिदान दिलेल्या थोर क्रांतिकारकांचे विचार मांडून शालेय परिसर मंत्रमुग्ध केला त्यानंतर अध्यक्ष भाषण माननीय श्री कैलास कळवंडे यांनी केले त्यातून त्यांनी शालेय विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शालेय सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मा. श्री दत्तात्रय कान्हूरकर, मा.श्री युवराज दादा शिंदे यांनी शाळेला साऊंड सिस्टिम भेट दिली. या कामकाजासाठी त्यांचा शाळेकडून सत्कार करण्यात आला तसेच 9 ऑगस्ट 2023 या रोजी घेण्यात आलेल्या भाषण स्पर्धेमध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना शाळेकडून बक्षीस वितरित करण्यात आले. शाळेच्या प्राचार्या सौ पल्लवी कुटे मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले त्यानंतर कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने तसेच सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून करण्यात आली.