श्री समर्थ स्कूल अँड काॅलेज मध्ये शासकीय रेखा कला परीक्षेचे आयोजन

कुरुळी ता. १३ :- कला संचालनालयाच्या वतीने शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट) परीक्षेसाठी चिंबळी फाटा (ता. खेड) येथील श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज या विद्यालयातील उपकेंद्रावर श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल चिंबळी फाटा, श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल खराबवाडी, श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल निघोजे, इंदिराजी माध्यमिक विद्यालय मोई,आनंद इंग्लिश मीडियम स्कूल, कुरुळी.डी.व्ही.जे. इंटरनॅशनल स्कूल, चिंबळी. या शाळांतील एकूण २७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ही परीक्षा दिनांक ४ ते ७ ऑक्टोबर पर्यंत शासनाच्या कला संचालनालयातर्फे घेण्यात आली. श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजमधील उपकेंद्रावर यावर्षी प्रथमच परीक्षेचे आयोजन केले होते. या उपकेंद्रावर एलिमेंटरीचे एकूण १८३ तर इंटरमिजिएट साठीचे ९५ असे एकूण २७८ विद्यार्थी बसले आहेत. ‘श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे’ अध्यक्ष मा. श्री. शिवाजीराव गवारे सर, सचिव मा. सौ.विद्याताई शिवाजीराव गवारे मॅडम यांनी संस्थेच्या वतीने परीक्षेसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. उपकेंद्र संचालक म्हणून प्राचार्या मा.सौ. अनिता टिळेकर मॅडम यांनी काम पाहिले तर चित्रकला विभाग प्रमुख श्री. संतोष जोशी सर, श्री. अजित थोरात सर व श्री. श्रीहरी पांचाळ सर यांनी कामकाज पाहिले. परीक्षा कालावधीमध्ये पर्यवेक्षिका सौ.शुभांगी भोंडवे मॅडम,सौ.शोभा तांबे मॅडम सौ.मोनाली मुंगसे मॅडम यांनी नियोजन केले तर सुरज सोमवंशी सर,मीनाक्षी पाटील मॅडम, कृष्णकांत कांबळे सर, निखिल कांबळे सर,सिद्धेश धोंडगे सर, आदित्य वाजे सर,नितीन दिलपक सर,दिपाली थोरात मॅडम, कोमल शिंदे मॅडम, वर्षा दिघे मॅडम, प्रियंका येळवंडे मॅडम, आसावरी वैद्य मॅडम,अनिता खडसे मॅडम, सिंधु धोत्रे मॅडम, भाग्यश्री हिरमुके मॅडम,जुही राऊत मॅडम, दीप्ती लोखंडे मॅडम, इत्यादी शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले. परीक्षा कालावधीत ‘श्रम साफल्य शिक्षण संस्थेचे’ सचिव मा. श्री. कैलास दादा ठाकूर पाटील, सुमंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ठाकूर पिंपरी, चे प्राचार्य मा.श्री. दिलीप ढमाले सर, राजेंद्र यादव सर, तसेच इंदिराजी माध्यमिक विद्यालय मोई चे प्राचार्य मा.श्री.नवनाथ तोत्रे सर, शिक्षक श्री.सत्यवान ताजने सर, श्री. ज्ञानेश्वर कळमकर सर यांनी यावेळी भेट देऊन परीक्षा विभागाच्या कामकाजाची पाहणी केली.