श्री समर्थ विद्यालयाची खेळाडू अफीफा मलिक विभागात अव्वल

चाकण ता.२० – अहमदनगर येथे पार पडलेल्या ‘विभाग स्तरीय वुशू स्पर्धेत’ श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल, खराबवाडी शाळेतील १७ वर्षे वयोगटातील खेळाडू कु.अफिफा अबूबकर मलिक हिने वुशू या क्रीडा प्रकारात ६५-७० या वजनी गटात विभाग पातळीवर प्रथम क्रमांक पटकावला असून तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. गुणवंत खेळाडू अफिफा मलिक व प्रशिक्षक श्री. जयेश कसबे सर यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.शिवाजीराव गवारे सर ,सचिव मा. सौ.विद्याताई गवारे मॅडम,प्राचार्या मा. सौ. विद्या पवार मॅडम तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व राज्य पातळीवर होणाऱ्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.