श्री समर्थ पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली

श्री समर्थ पतसंस्थेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक २० ऑगस्ट २०२३ रोजी हॉटेल मोशी इम्पेरियल, मोशी येथे संस्थेचे अध्यक्ष मा शिवाजीराव गवारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, सभेत सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या आर्थिक पत्रकांना, सभासदांना ९% लाभांश व संस्थेच्या चऱ्होली बुद्रुक येथे नव्या शाखेसाठी चर्चा करून मंजुरी देण्यात आली. महा. राज्य सह. संघ प्राध्यापक श्री विलास लिंबळे यांनी सभासद प्रशिक्षण घेतले. दिनांक ३१ मार्च २०२३ अखेर संस्थेच्या ६० कोटी ९६ लाख ठेवी व ४७ कोटी ८० लाख कर्ज वाटप केले आहे संस्थेला सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात ७२ लाख ९४ हजार इतका नफा झाला आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री शिवाजीराव गवारे यांनी उपस्थित सभासदांना मार्गदर्शन केले व संस्थेची भविष्यातील ध्येय धोरणे सांगीतली, सभेस संस्थेच्या उपाध्यक्षा सौ सुरेखाताई गवारे, खजिनदार संतोषशेठ गवारे, संचालक सुधीरशेठ मुऱ्हे, उमेशशेठ येळवंडे, स्वप्नील गवारी, विद्याताई गवारे, दिगंबर ठोंबरे, भानुदास गोडसे, प्रकाश लिंभोरे, गोरख बोत्रे, नितीन करपे, विनायक मराठे, नंदकुमार बेंडाले, अंकुश नाणेकर, कुलदीप येळवंडे, संतोष बनकर, सल्लागार विठ्ठल ठाकुर, शरद गोडसे, भगवान साकोरे, शेखर करपे, पै रविंद्र गवारे, कैलास येळवंडे, भरत करपे, रोहीदास गवारे, बाबुराव लेंडघर, ॲड मनोहर जंबुकर, ॲड अतुल घुमटकर, बबन कवडे, कैलास पडवळ, ज्ञानेश्वर ठाकुर आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे कार्यक्रमास पाहुणे म्हणून अशोक भोकसे, मनोज आल्हाट, अभिजीत काळे उपस्थित होते. यावेळी सन २०२२-२३ या वर्षाचे गुणवंत कर्मचारी अभिषेक कोल्हे, दिपक गवारे, शुभम सस्ते, साहिल डांगले, ऋषिकेश काळजे, गुणवंत दैनंदिन प्रतिनिधी वैशाली गवारे, शैला बेंडाले, मंगल बोत्रे यांना सन्मानित करण्यात आले, तर उत्कृष्ठ शाखा म्हणुन सोळू शाखेचा सन्मान करण्यात आला. उपस्थित सभासद गोरख गवारे, यांनी संस्थेस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीईओ अमोल गवारे शाखा व्यवस्थापक अर्जुन जाधव व संतोष साकोरे यांनी केले. उपस्थीत सभासदांचे आभार शेखरजी करपे यांनी मानले.