‘श्री समर्थ इंग्लिश मीडिअम स्कूल’ चाकण शाखेत श्री गणरायाचे आगमन

चाकण ता.२७ ‘श्री समर्थ ग्रुप ऑफ स्कूल’ च्या चाकण शाखेत प्रथमच ‘श्रीं’ चे आगमन झाले असून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.शिवाजीराव गवारे व सचिव मा.सौ.विद्याताई गवारे व प्राचार्या स्वाती सोनवणे ,विवेक मुंगसे ,बळीराम कदम ,शिक्षक वृंद ,पालक व मान्यवरांच्या हस्ते विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

गणेशोत्सव काळात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये मातीपासून गणपती बनवणे ,गणपती स्तोत्र पठण ,गणपती कथाकथन, संवाद कथन स्पर्धा , चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. विजेत्या विद्यार्थ्यांना मुख्य अतिथी मा.श्री. सुरज वाल्हेकर सर आणि नेहा सुरज वाल्हेकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रकाचे वाटप करण्यात आले त्यावेळेस वाल्हेकर सरांनी विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले.
महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा( मोदक बनवणे),संगीत खुर्ची, अशा वेगवेगळ्या स्पर्धाचे आयोजन करून बक्षीस वितरण करण्यात आले.
आदरणीय बबनराव गवारे, संतोष देवकर सर, सुरज वाल्हेकर सर, अश्विनी देवकर, अमित पवळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ व प्रसादाचे वाटपकरण्यात आले.
गणरायाची आरती व शाळेच्या विविध कार्यक्रमामध्ये पालकांनी सहभागी होऊन उत्सवाची शोभा वाढवली.