राष्ट्रवादी सार्वजनिक ग्रंथालय विभाग पुणेच्या अध्यक्षपदी संभाजी अवघडे यांची निवड

आज राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागची आढावा बैठक हॉटेल अजिंक्य चिंबळी येथे झाली यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभाग प्रदेश अध्यक्ष श्री उमेशजी पाटील साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभाग राज्याच्या समन्वयक सौ रीताताई बाविस्कर या उपस्थित होत्या तसेच श्री संभाजी धोंडीबा अवघडे यांची दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभाग पुणे जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करून तसे पत्र त्यांना देण्यात आले. ग्रंथालय चळवळीतील श्री संभाजी अवघडे यांनी गेली १०वर्ष उत्तम काम केले आहे ,तसेच १६जून २०२३रोजी अमरनेळ,धुळे येथे झालेल्या राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे राज्यस्तरीय अधिवेशन मध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते श्री संभाजी धोंडीबा अवघडे यांना शरदचंद्र ग्रंथ मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला गाव तेथे ग्रंथालय ही चळवळ सर्वत्र राबविण्याचा संकल्प संभाजी अवघडे यांनी सांगितला .या मध्ये उपस्थितीत मध्ये कृ ऊ बा समिती चे मा सभापती विलासशेठ कातोरे , मा सरपंच अर्जुन अवघडे, विद्यमान उपसरपंच श्री राहुल शेठ चव्हाण, खेड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव पै संदीपशेठ जैद उपस्थित होते, संभाजी अवघडे यांची निवड झाल्याबद्दल श्री समर्थ ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मा श्री शिवाजीराव गवारे यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.