दैनिक प्रभातचा आदर्श सरपंच पुरस्कार

मोई गावचे मा. उपसरपंच व विद्यमान सदस्य श्री. गोरख बापू गवारे यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व उच्च शिक्षण मंत्री म. चंद्रकांतदादा पाटील व पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रमेशजी चव्हाण साहेब यांच्या शुभहस्ते आदर्श उपसरपंच पुरस्कार देण्यात आला. यावेळी आदर्श मा. उपसरपंच गोरख बापू गवारे यांना गावच्या विकासासाठी पालकमंत्री यांनी दहा लाखाचा निधी ग्रामपंचायत मोई ला दिला.