जेष्ठ साहित्यिक प्रा. मधुकर गिलबिले यांची साहित्य गौरव पुरस्कार २०२३ करीता निवड

राजगुरुनगर संजय दाते पाटील चासकमान परिसरातील कहू-कोवाळी, तालुका खेड येथील जेष्ठ साहित्यिक प्रा. मधुकर गिलबिले गुरुजी यांची “साहित्य गौरव पुरस्कार २०२३ करीता निवड झाल्याचे निवडपत्र संमेलन कार्याध्यक्ष रानकवी जगदिप वनशिव यांनी मधूकर गिलबिले यांना दिले आहे. इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे येथील संत तुकाराम महाराज पालखी तळ या ठिकाणी रविवार दिनांक २० ऑगस्ट २०२३ रोजी सातवे संत तुकाराम महाराज मराठी ग्रामीण साहित्य संमेलन आयोजीत करण्यात आले आहे. यावेळी साहित्य, नाट्य चित्रपट

कला, पत्रकारिता, सामाजिक शैक्षणिक कार्यात आपला वेगळा ठसा उमटवणान्या मान्यवरांना साहित्य संमेलनात मान्यवरांचे हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात वेणार आहे. मधुकर गिलबिले यांचे साहित्य क्षेत्रात चार पुस्तकांचे र लेखन, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण मार्फत र साहित्य क्षेत्रात कार्य तसेच 5 राज्यातील विविध साहित्य न संमेलन, कवी संमेलन यात सक्रिय सहभाग या बदल मधुकर गिलबिले यांना हा 5. पुरस्कार देण्यात येणार आहे. साहित्य व इतर सर्व म स्तरातून याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.